• Total Visitor ( 576666 )
News photo

पारसिक नगर,कळवा येथे भारतीय डाक विभागातर्फे आधार कार्ड शिबिराचे आयोजन

Raju Tapal publisher June 08, 2026 22

पारसिक नगर,कळवा येथे भारतीय डाक विभागातर्फे आधार कार्ड शिबिराचे आयोजन



कळवा:-भारतीय डाक विभागातर्फे पारसिक नगर,कळवा येथे आधार कार्ड शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. नागरिकांना आधार कार्डाशी संबंधित सेवा तसेच पोस्टाच्या विविध बचत व विमा योजनांची माहिती आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम ठाणे विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रविराज वदक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीनियर पोस्टमास्तर, ठाणे प्रधान डाक घर श्री राजीव हुईलगोळ,तसेच श्री. डी. के. परब (सहाय्यक निर्देशक,डाक सेवा),यांचे उपस्थितीत पार पडला यासाठी मन्मथ लोकेवार (मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह,ठाणे प्रधान डाक कार्यालय) आणि ठाणे विभागाच्या टीमने नागरिकांना विविध सेवा पुरवल्या. शिबिरामध्ये नवीन आधार नोंदणी, बाल आधार नोंदणी व आधार अद्ययावतकरण,ज्येष्ठ नागरिकांचे बायोमेट्रिक अद्ययावतकरण,टपाल जीवन विमा (PLI),सुकन्या समृद्धी खाते तसेच पोस्ट विभागाच्या विविध समाजोपयोगी योजनांची माहिती व सुविधा नागरिकांना देण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय टपाल विभाग समाजहिताच्या विविध योजना राबवून “डाक सेवा जनसेवा” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement