कल्याण अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांची कारवाई ...
आंबिवलीत 13 लाखांचे MD ड्रग्स जप्त; ड्रग्स तस्कर अब्बास इराणी पोलिसांच्या जाळ्यात,22 जूनपर्यंत पोलिस कोठडी
कल्याण:- कल्याण अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलीसांच्या पथकाने आंबिवली परिसरातून ड्रग्स तस्करी करणाऱ्या अब्बास हैदर सय्यद इराणी याला बेड्या ठोकल्यात. अब्बास जवळून तब्बल 13 लाख 25 हजार रुपये किमतीचे MD ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. दरम्यान अब्बासने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करत अब्बासच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान चोरट्यांची वस्ती म्हणून कुप्रसिद्ध असलेली आंबिवली मधील इराणी वस्तीमध्ये ड्रग्स तस्करी सूरु असल्याचे दिसून आल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाला गस्ती दरम्यान आंबिवली परिसरात MD ड्रग्स घेऊन एक तरुण फिरत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी आंबिवली परिसरात सापळा रचला . याच दरम्यान दुचाकीवरून जाणाऱ्या अब्बास इराणीवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अब्बास गाडी अडवून त्याची चौकशी सुरू केली . चौकशी दरम्यान घाबरलेल्या अब्बासने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी काही अंतरावरच पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. आप्पाच्या दुचाकीची झडती घेतली असता त्याच्या गाडीच्या डिक्कीतून पोलिसांना MD अमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी तत्काळ अब्बास ला ताब्यात घेत त्याच्याकडील 13 लाख रुपये किमतीचे MD ड्रस जप्त केले त्याची दुचाकी त्याचा मोबाईल देखील जप्त केला. अब्बास इराणी याने MD कोठून आणले,ते कोणाला पुरविण्यात येणार होते, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का,याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याशिवाय आरोपीच्या मोबाईल व सिमकार्डच्या आधारे संपर्कांची माहिती,कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR),तसेच बँक खात्यांतील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी आज अब्बासला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.