• Total Visitor ( 546721 )

सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर FIR दाखल; बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

Raju Tapal publisher May 28, 2026 15

सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर FIR दाखल; बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद



कल्याण परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात कथितरित्या सुरू असलेल्या बेकायदेशीर कुर्बानी प्रकरणी अखेर बाजारपेठ पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे. प्राणी हक्क कार्यकर्त्या पल्लवी सचिन पाटील यांच्या सततच्या लेखी तक्रारी,ई-मेल्स,पुरावे,WhatsApp संदेश,प्रसारमाध्यमांना दिलेली निवेदने आणि विविध विभागांशी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,बाजारपेठ पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 167/2026 दाखल करण्यात आला असून,निवासी सोसायटी परिसरात कथितरित्या सुरू असलेल्या बेकायदेशीर कुर्बानीच्या तयारी आणि संबंधित उपक्रमांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पल्लवी पाटील यांनी 26 मे 2026 पासून सातत्याने विविध शासकीय विभागांकडे तक्रारी व निवेदने सादर केली होती. त्यांनी पोलीस प्रशासन,KDMC अधिकारी,SPCA,पशुवैद्यकीय विभाग तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी केली होती. तसेच,27 आणि 28 मे रोजी अतिरिक्त पुरावे,WhatsApp संदेश,मीडिया लिंक्स आणि सविस्तर कायदेशीर निवेदनेही संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली होती. यापूर्वी पोलीस विभाग आणि KDMC प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या असून संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारीनुसार,अधिकृत सूचना आणि प्रतिबंधात्मक आदेश असूनही गृहनिर्माण सोसायटी परिसरात कथितरित्या बेकायदेशीर तयारी सुरूच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन होत असल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 325,223,3(5),महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 105,117 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम कलम 11(1)(k) आणि 30 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव,पोलीस उपायुक्त अतुल झेंडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड, KDMC ‘क’ प्रभाग अधिकारी धनंजय थोरात,KDMC आयुक्त तसेच जिल्हा SPCA सचिव डॉ. वल्लभ जोशी यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. दरम्यान,“हा मुद्दा कोणत्याही धर्म किंवा समुदायाच्या विरोधात नसून कायद्याचे पालन,सार्वजनिक आरोग्य,स्वच्छता,प्राणी कल्याण,गृहनिर्माण संस्थांचे नियम आणि कायदा व सुव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे,”असे पल्लवी पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी,पंचनामा,न्यायवैद्यकीय तपासणी आणि पुरावे जतन करण्यासह पुढील सखोल तपास अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement