• Total Visitor ( 430473 )
News photo

ढोकसांगवी येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरूवात 

Raju tapal April 08, 2025 152

ढोकसांगवी येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरूवात 

    

शिरूर :-शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास  रविवार दि.६ एप्रिल २०२५ पासून ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे यांच्या कीर्तनाने सुरूवात झाली.

पहाटे ४ ते ६ काकडा भजन ,सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत विष्णू सहस्त्रनाम,सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत गाथा भजन, सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत प्रवचन सायंकाळी ५ ते ६.३० वाजेपर्यंत हरिपाठ, रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत हरि कीर्तन, रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार असल्याचे कीर्तन सोहळ्याचे भालदार, चोपदार, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय शिवाजीराव पा्चंगे‌ यांनी कळविले.

रविवार दि.६ एप्रिल पासून सुरूवात झालेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्यात ह.भ.प.भास्कर महाराज सरोदे यांचे प्रवचन पार पडले.,मेघा महाराज रमेश पाचंगे , चंद्रकांत महाराज श्रीमंत, ठकाराम महाराज मलगुंडे , विष्णू महाराज पोंदाळ या प्रवचनकारांचे प्रवचन सप्ताह काळात पार पडणार असून ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे यांचे कीर्तन पार पडले.रामायणाचार्य संतोष महाराज कौठाळे,रमेश महाराज तांबडे, रूपाली महाराज सवणे‌, वैष्णवी महाराज टेंगले, विकास महाराज देवडे‌, या कीर्तनकारांचे हरि कीर्तन सप्ताह सोहळ्यात आयोजित केले आहे.

जयमल्हार भजनी मंडळ ढोकसांगवी,जय हनुमान भजनी मंडळ परीटवाडी, भजनी मंडळ शेळकेमळा, संत जनाबाई,संत सखुबाई भजनी मंडळ पिंपळे धुमाळ,गुरूदत्त भजनी मंडळ वाघाळे, तसेच सरदवाडी,कारेगाव.बाभूळसर बुद्रुक, पिंपरी दुमाला,श्री.क्षेत्र रामलिंग, सोनेसांगवी,मांडवगण फराटा येथील भजनी मंडळांचा हरिजागर सप्ताह सोहळ्यात पार पडणार आहे.

शनिवार दि.१२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत ह.भ.प. मधूकर महाराज शिंगाडे यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाने हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप होणार असून अन्नदात्यांच्या सहकार्याने या हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे हरिनाम सप्ताह सोहळ्याचे भालदार, चोपदार, भारतीय जनता पार्टी  उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय शिवाजीराव पाचंगे यांनी कळविले आहे.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( कोंढापुरी ता‌.शिरूर जि.पुणे )

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement