• Total Visitor ( 429459 )
News photo

साता-यातील सैन्यदलातील जवान सोमनाथ सुर्वे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Raju tapal October 11, 2025 162

साता-यातील सैन्यदलातील जवान सोमनाथ सुर्वे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- सातारा जिल्ह्यातील क-हाड तालुक्यातील आबईची‌ वाडी येथील सैन्यदलातील जवान सोमनाथ शामराव सुर्वे वय -४७ यांचे चंदीगड येथे कर्तव्यावर कार्यरत असताना अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. सातारा जिल्ह्यातील आबईची‌ वाडी येथील सोमनाथ सुर्वे हे गेली १८ वर्षे भारतीय सैन्यदलातील मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये कार्यरत होते. मध्यंतरी त्यांना हवालदार पदावर बढती मिळाली होती.सहा महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. सध्या ते चंदीगड मध्ये कार्यरत होते.ते अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. गावातील तरुण सैन्यदलात भरती व्हावे यासाठी ते सुट्टीवर गावी आल्यावर युवकांना नेहमी मार्गदर्शन करत.त्यांचे पार्थिव चंदीगड वरून पुणे विमानतळावर आणण्यात आले त्यावेळी भारतीय सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव सातारा जिल्ह्यातील त्यांच्या आबईची‌ वाडी या मुळगावी नेण्यात आले. तत्पूर्वी क-हाडच्या पाटण तिकाटणे येथून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. क-हाड तालुक्यातील आबालवृद्धांचा जनसमुदाय यावेळी लोटला होता.अमर रहे ,अमर रहे सोमनाथ सुर्वे अमर रहे , जयहिंद, भारत माता की जय अशा दुमदुमणा-या घोषणा यावेळी देण्यात आल्या.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement