• Total Visitor ( 431178 )
News photo

नडगाव-दानबाव ग्रामपंचायत सरपंच पदि अरुणा चौधरी याची बिनविरोध निवड

Raju tapal May 28, 2025 75

नडगाव-दानबाव ग्रामपंचायत सरपंच पदि अरुणा चौधरी याची बिनविरोध निवड



नडगाव-दानबाव ग्रामपंचायत सरपंच पदि अरुणा सतिश चौधरी याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आप आपसात ठरल्याप्रमाणे प्रमिला प्रकाश लोणे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच कल्याण तहसीलदार यांच्या आदेशानुसार सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी अरुणा सतिश चौधरी यांनी अर्ज निवडणूक अधिकारी तथा सभेच्या अध्यक्षा दर्शना भावे यांच्याकडे दाखल केला.

सदस्य उषा लोणे,प्रमिला लोणे,शेवंताबाई जाधव, कैलास रावते व अरुणा चौधरी,ग्राँमसेवक प्रसेन गोतारणेउपस्थित होते. सरपंच पदाकरिता एकच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी दर्शना भावे यांनी अरुणा चौधरी यांची सरपंच पदि निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी कार्यकर्ते यांनी फटाके वाजवुन गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

नवनिर्वाचित सरपंच अरुणा चौधरी यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, उपजिल्हा प्रमुख सुदाम पाटील, माजी सरपंच आदेश चौधरी, रवींद्र जाधव,अँड संतोष भोईर, विजय भोईर,भगवान सुरोशी,नितेश सोनावणे,सदिप चौधरी यांच्या सह आदि उपस्थित होते.

शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी सांगितले की ठरल्याप्रमाणे प्रत्येक सदस्याला सरपंच व उपसरपंच पदाची संधी दिली आहे. खेळीमेळीच्या आंनदमय वातावरणात निवडणूक पार पडली आहे असे सांगितले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement