• Total Visitor ( 700721 )

आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे

Raju tapal October 18, 2024 133

आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे; 

मविआच्या जागा वाटपावरुन संजय राऊत संतप्त 



मुंबई:-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी नियमित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. मविआच जागा वाटप कुठे रखडतय ते सांगितलं. आता सकाळी माझी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकूल वासनिक यांच्याशी बोलणं झालं. आज राहुल गांधींशी बोलणार आहे. सीट शेयरिंग बद्दल थांबलेल्या गोष्टींना गती मिळावी यासाठी चर्चा करणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. बऱ्याच जागांवर निर्णय झालाय. काही जागांवर निर्णय होत नाहीय. आता वेळ कमी आहे. महाराष्ट्राचे नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत असं मला वाटतं. ते वारंवार दिल्लीत यादी पाठवतात. मग, चर्चा होते. आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.



राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत मतभेद नाहीयत. काँग्रेस बरोबर सुद्धा तसे मतभेद नाहीयत. पण काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करत आहेत. काँग्रेस हायकमांडसोबत आम्ही चर्चा केली. बैठकीत जी चर्चा झाली, त्या बद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं. 200 पेक्षा जास्त जागांवर सहमती झालीय. पण काही जागांवर तिढा, पेच आहे. उद्धव ठाकरेंनी काही सूचना केल्यात, त्याचं पालन करीन” असं संजय राऊत म्हणाले. मी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सुद्धा काही सूचना मला केल्या आहेत. त्यानुसार आम्ही जागा वाटप पूर्ण करू. कोणाची काय बैठकीत भूमिका आहे हे मी उद्धव ठाकरेना सांगितलं आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव आम्हाला करायचा आहे. भारतीय जनता पक्षाशी कसा लढायचं हे आम्हाला माहिती आहे. भाजपने सर्वात जास्त शिवसेनेला त्रास दिला आहे. भाजपची बिष्णोई गँग आम्हाला त्रास देत आहे. हा त्रास सहन करून आम्ही उभे आहोत, असे संजय राऊत म्हणाले. 



काँग्रेसचे काही नेते विदर्भातील काही जागांवर अडून आहेत. त्यामुळे जागा वाटपाला उशीर होत आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे ते काय स्वतंत्र नाही. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही जिंकले आहेत. शिवसेनेचे खासदार जिंकले आहेत. रामटेकसारखी सहा वेळेला निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली आहे. अमरावतीची आमची हक्काची जागा आम्ही काँग्रेसला दिली. त्या बदल्यात आम्ही विधानसभेला काही अपेक्षा ठेवल्या तर त्यात चुकीचे असे काही मला वाटत नसल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने काही जाचक आणि विरोधी पक्षांना अडचणीत आणणारे निर्णय जाहीर केले आहे. ते फक्त भाजप आणि शिंदे गटाला मदत होईल अशा पद्धतीचे निर्णय आहेत.असेही संजय राऊत म्हणाले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026