राजस्थानचे राज्यपाल बागडे यांच्या हस्ते राजेंद्र सातव यांना 'शिव गौरव पुरस्कार' प्रदान...
पुणे,लाल महाल येथे पुरस्कार सोहळा संपन्न -
फुलगाव (गौतम पाटोळे) :- पुणे येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते तथा श्री शंभू राज्याभिषेक ट्रस्ट,पुणे यांच्या वतीने वाघोली विकास प्रतिष्ठान(वाघेश्र्वर देवस्थान) चे अध्यक्ष तथा वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांना प्रतिष्ठेचा 'शिव गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. श्री शंभूराज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने पुणे येथील लालमहाल येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना 'शिव गौरव पुरस्कार' देवून गौरविण्यात आले.यामध्ये समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राजेंद्र सातव पाटील यांना मान्यवरांच्या उपस्थितीत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते 'शिव गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राजेंद्र सातव पाटील यांनी हा सन्मान आपल्याला अधिक जबाबदारीने समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.पुरस्कार मिळाल्याबद्दल सातव पाटील यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.यावेळी वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव पाटील सह विविध मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र ओळ:-पुणे(लाल महाल) येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना राजेंद्र सातव पाटील.