शिवणी बु.येथे सिकलसेल आजारा बाबत जनजागृती
आयुष्यमान आरोग्य मंदीर उत्तमसराचे आयोजन
भातकुली/अमरावती-पंचायत समिती भातकुली मधिल शिवणी बुद्रुक येथे आज दिनांक 11 डिसेंबरला आयुष्यमान आरोग्य मंदिर उत्तम सरा अंतर्गत सिकलसेल जनजागृती सप्ताह राबविण्यात आला यामध्ये डॉक्टर सोनाली देशमुख यांनी सिकलसेल विषयी विस्तृत माहिती सांगण्यात आली .ज्या ॲनिमिया मध्ये रक्तपेशींचा आकार विळाप्रमाणे अर्ध चंद्राकृती होतो त्याला सिकलसेल असे म्हणतात .सिकल सेलचे दोन प्रकार असतात एक हे सिकलसेल ग्रस्त आणि सिकलसेल वाहक सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे सिकलसेल मध्ये रक्त पेशींचा चा आकार वी ळाप्रमाणे झाल्यामुळे रक्तप्रवाह मध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे अंग दुखणे ,पोट दुखणे ,सतत थकवा जाणवणे,वारंवार जंतूचा संसर्ग होणे असे लक्षणे यामध्ये आढळतात सिकलसेल ची तपासणी लग्नापूर्वी करणे महत्त्वाचे आहे कारण एक वाहक आणि एक ग्रस्त यांनी लग्न करू नये तसेच दोन वाहक यांनी देखील लग्न करू नये तसेच दोन ग्रस्त यांनी देखील लग्न करू नये कारण यामुळे त्यांच्या होणारे बाळ हे सिकलसेल ग्रस्त होण्याचे चान्सेस जास्त असते आणि सिकलसेल ग्रस्त मातेने गरोदर राहिल्यास पहिल्या तीमही मध्येच गर्भजलाची परीक्षण करून घ्यावे. सिकलसेल लोकांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात कारण त्यामुळे नवीन रक्तपेशींची निर्मिती होते सिकलसेल लोकांनी पाणी भरपूर प्यावे,हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे खूप जास्त एक्झरशन करू नये. उपकेंद्रस्तरावर सिकलसेल साठी सोलबलिटी टेस्ट केल्या जाते यामध्ये सकारात्मक परिणाम आल्यास त्या लाभार्थ्यांना hb इलेक्ट्रोफोरेसिस साठी जिल्हा रुग्णालयात संदर्भित केल्या जाते तिथे वाहक AS आणि ग्रस्त SS असे दोन प्रकार केले जातात. वाहक लोकांना पिवळे गाठ दिले जाते आणि ग्रस्त लोकांना लाल कार्ड दिल्या जातात तसेच औषधोपचार मोफत केला जातो. सिकलसेल जनजागृती सप्ताह यशस्वी करण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्वेता सालफळे,तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण खराटे, उपकेंद्र उत्तम सरांच्या डॉक्टर सोनाली देशमुख,आरोग्य सहाय्यक श्री आकाश हिंगलासपुरे, आरोग्य सविका मंगला वानखेडे, आरोग्य सेवक श्री चेतन राठोड,सिकलसेल समुपदेशक मेघा चर्जन,आशा वैशाली मावंदे अंगणवाडी सेविका प्रतीक्षा भटकर,जिल्हा परिषद शाळेच्या निकोसे मॅडम,श्रीमती धोटे मॅडम,या सर्वांचे सहकार्य लाभल.