मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो
Raju tapal
November 11, 2024
17
मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो.
चला चला मतदानाला
मतदान जनजागृती घोषणांनी उत्तमसरा गाव दणाणले
पं. स.भातकुली स्वीप अंतर्गत बडनेरा विधानसभा क्षेत्रात मतदार जनजागृती जोरात.
दिपकजी कोकतरे साहेब (गटशिक्षणाधिकारी पं. स.भातकुली साहेब तथा स्वीप नोडल अधिकारी बडनेरा ) यांच्या मार्गदर्शनात पिंक फोर्स च्या माध्यमातून मतदार जनजागृती.
भातकुली/अमरावती दि.११-आज दि.११/११/२०२४ रोज सोमवार ला पं. स.भातकुली स्वीप च्या माध्यमातून ग्राम उत्तमसरा येथे पिंक फोर्स स्थापन करून सकाळी ८ ते ११ या कालावधीत मतदान जनजागृती करण्यात आली.
यावेळी मा.दिपकजी कोकतरे साहेब (नोडल अधिकारी, बडनेरा )यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पिंक फोर्स च्या माध्यमातून ग्राम उत्तमसरा येथे घरोघरी जावून गृह भेटी घेवून मतदान जनजागृती करण्यात आली.
येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुटुंबातील सर्वांनी सहभागी होऊन १००% मतदान करावे असे आवाहन यावेळी गृह भेटी,मतदार प्रतिज्ञा, प्रभातफेरी,व्होटर स्लिप च्या माध्यमातून ग्रामस्थांना करण्यात आले,यावेळी ग्रामस्थांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
या जनजागृती कार्यक्रमाला दिपकजी कोकतरे साहेब (गटशिक्षणाधिकारी, पं. स.भातकुली तथा स्वीप नोडल अधिकारी बडनेरा विधानसभा मतदार संघ),निताताई सोमवंशी मॅडम (केंद्रप्रमुख गणोरी तथा स्वीप सदस्य,भातकुली),राजेशजी सावरकर सर (स्वीप सदस्य,भातकुली),डॉ.सोनाली देशमुख मॅडम (उपकेंद्र उत्तमसरा),संतोष कुर्हेकर सर ( जि.प.विद्यालय उत्तमसरा),मा.शैलेंद्र स.दहातोंडे (केंद्रप्रमुख भातकुली तथा स्वीप सदस्य,भातकुली) मा.सुजाता सोनवणे मॅडम (स्वीप सदस्य भातकुली) मा.प्रज्ञा रामटेके मॅडम (स्वीप सदस्य,पं. स.भातकुली),मंदा आंडे मॅडम(स्वीप सदस्य पं. स.भातकुली),मेघा साबळे मॅडम(स्वीप सदस्य पं. स.भातकुली), ग्रामपंचायत ग्राम अधिकारी उत्तमसरा आशिष अंबडकर,मुख्याध्यापिका मिनाक्षी इंगळे,स.शि.गजानन येलोने,सुनिता अकर्ते,यु.आर.बसरे,सरोज मोहीते,योगिता वानखडे,मो.कुदूस,सौ.आश्विनी झाडे,कु.शितल भोपाळै,प्राजक्ता भडके,श्रीमती जे.आर.हायगले,राजेन्द् अकर्ते,सी.पी.ब्राम्ळणकर,प्रमोद कांबळे,रुपाली बेलसरे,वर्षा मानकर,प्रज्ञा रामटेके,मंदा आंडे,अपर्णा झाडे,चंद्रशेखर मावंदे,दिलीप राऊत,सतिश पवार,गजानन सायंके,एन.व्ही.जिरापूरे, ग्रामपंचायत शिपाई महेंद्र पेढेकर व ग्रामंचायत पाणी पुरवठा कर्मचारी शुभम सुनील अवचार सह गणोरी मधिल सर्व शिक्षक बंधू भगिनी,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.असे स्वीपचे राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
Share This