• Total Visitor ( 430210 )
News photo

मयुरेश्वर मंदीरातील भाद्रपदी यात्रा उत्सवाला सुरुवात 

Raju tapal August 24, 2025 53

मयुरेश्वर मंदीरातील भाद्रपदी यात्रा उत्सवाला सुरुवात 



१ लाखांहून अधिक भाविकांकडून जलस्नानाचा लाभ



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- अष्टविनायकांपैकी पहिले स्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील मयुरेश्वर मंदीरातील भाद्रपदी यात्रेला आजपासून (दि.२४ आॅगस्ट) सुरूवात झाली असून सुमारे १ लाख भाविकांनी जलस्नानाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजल्यापासून मंदीरासमोर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत भाविक भक्तांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले.

पुढील तीन दिवस भाविकांना गाभा-यात प्रवेश तसेच जलस्नानाची संधी मिळणार असून संपूर्ण यात्रेसाठी देवस्थान ट्रस्ट, मोरगाव ग्रामस्थांकडून भाविकांच्या सोयीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली आहे.

        


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement