• Total Visitor ( 580262 )
News photo

भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दौंड तालुक्यातील बोरमलनाथ मंदीर येथे आयोजन 

Raju Tapal publisher May 20, 2026 28

भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दौंड तालुक्यातील बोरमलनाथ मंदीर येथे आयोजन 



शिरूर (प्रतिनिधी विजय ढमढेरे):- अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेले ५ वे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि.२३ व रविवार दि‌.२४ मे २०२६ रोजी स्व.लोकनेते सुभाष आण्णा कुल साहित्य नगरी बोरमलनाथ मंदीर चौफुला,केडगाव,बोरीपार्धी ता‌.दौंड जि‌.पुणे येथे पार पडणार आहे.कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जेष्ठ साहित्यिक दशरथ यादव,भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे,उपाध्यक्ष दिपक पवार यांनी ही माहिती निमंत्रण पत्रिकेद्वारे कळविली.दौंड तालुक्याचे आमदार राहूलदादा कुल यांच्या हस्ते भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी दि.२३ मे‌ २०२६ रोजी दुपारी १२ करण्यात येणार असून संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक प्रा.फ.मु.शिंदे भुषविणार आहेत.रा.स.प.चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, आय.बी.एन.लोकमतचे संपादक मंदार फणसे यांची प्रमुख उपस्थिती संमेलनास असणार आहे.राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार,खासदार सुप्रियाताई सुळे,पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवलजगदाळे,दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात,पुरंदरचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर,दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले‌,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डाॅ.दिगंबर दुर्गाडे,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे,पुणे केंब्रिज शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुंजीर,पुणे जिल्हा परिषदेचे  माजी अध्यक्ष जालिंदर कामठे,देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय सर्जेराव जेधे, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश पासलकर,पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबने‌,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दौंड अध्यक्ष नितीन दोरगे,भाजप नेते तानाजी दिवेकर प्रमुख पाहुणे म्हणून भीमथडी मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहेत.सैराट फेम प्रिन्स अभिनेता सुरज पवार,"प्रेमा तुझा रंग कसा" स्टार प्रवाह फेम कोमल शिंपी, आमदार विजय शिवतारे यांना किडनी देवून जीवदान देणारी लेक ममताताई शिवतारे -लांडे,"दख्खनचा ज्योतिबा" मराठी गीत फेम गायक तेजस जगदाळे यांचा या संमेलनात सत्कार केला जाणार आहे.

शनिवार दि.२३ मे‌ २०२६ रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे समन्वयक,ह.भ.प.संजय महाराज वाबळे यांच्या हस्ते ,पुणे जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे,ह.भ.प.प्रा‌.हरिष महाराज फडके यांच्या उपस्थितीत बोरमलनाथ महाराजांना जलाभिषेक करण्यात येणार असून सकाळी ११ वाजता पुरंदर पंचायत समिती सदस्य माऊली यादव यांच्या हस्ते,बदाम आण्णा माकर,कवीवर्य रा.वि.शिशुपाल,शरद यादव,सुर्यकांत विपट यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथपुजन करून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.दुपारी २ वाजता चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या संचालिका जयश्री अशोकराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यू अंबिका कला केंद्राचा लावणी कला सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी साडेतीन वाजता सैराट फेम अभिनेता सुरज पवार,लावणी सम्राज्ञी प्रिया काळे नगरकर यांची मुलाखत जेष्ठ साहित्यिक,मुलाखतकार दशरथ यादव घेणार आहेत.दुपारी ४ वाजता अहिल्यानगर येथील बाळासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन कार्यक्रम,सायंकाळी साडेचार वाजता जेष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली "वाचनसंस्कृती आणि आजचा समाज"या विषयावर परिसंवाद,सायंकाळी ५ वाजता परभणी येथील संतोष नारायणकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन सत्र पहिले,रविवार दि.२४ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पारगाव,दौंड येथील वाय के शेख यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन सत्र दुसरे,दुपारी १२ वाजता लोकरंग व सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम पार पडणार असून आय बी एन लोकमतचे संपादक मंदार फणसे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे,पश्चिम विभाग महाराष्ट्र मराठा महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप,बोरमल देवस्थानचे अध्यक्ष कैलासआबा शेलार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते भाऊसाहेब फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत ५ व्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप केला जाणार आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement