• Total Visitor ( 560731 )
News photo

भाजपची प्रसिद्धीची हाव! शववाहिनीवर राहुल नार्वेकर यांचा फोटो नागरिकांकडून संताप व्यक्त

Raju Tapal publisher June 02, 2026 42

भाजपची प्रसिद्धीची हाव! शववाहिनीवर राहुल नार्वेकर यांचा फोटो नागरिकांकडून संताप व्यक्त



मुंबई:- जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शववाहिनीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजप नेत्यांची छायाचित्रे झळकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुलाबा मतदारसंघात अंत्ययात्रेसाठी वापरल्या जाणाऱ्या शववाहिनीवर राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिक आणि समाजमाध्यमांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या शववाहिनीवर राहुल नार्वेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. मृत्यू आणि अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगातही राजकीय प्रसिद्धीचा वापर करण्यात आल्याची टीका होत आहे. अनेक नागरिकांनी याला "प्रसिद्धीच्या हव्यासाची परिसीमा" असे संबोधत नाराजी व्यक्त केली आहे. समाजमाध्यमांवर या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून, शववाहिनीसारख्या सार्वजनिक सेवांवर राजकीय जाहिरातबाजी करणे नैतिकतेला धरून नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. रुग्णवाहिका,बसथांबे आणि शववाहिनी यांसारख्या सेवांचा वापर केवळ जनहितासाठी व्हावा,त्यांचा राजकीय श्रेयासाठी वापर होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान,या प्रकरणामुळे विरोधकांनीही भाजपवर टीकेची झोड उठवली असून,सार्वजनिक सेवांचे राजकीय ब्रँडिंग थांबवावे,अशी मागणी पुढे येत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement