प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपच्या,तेजश्री हेमंत गायकवाड प्रबळ दावेदार
टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेचे आरक्षण मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी पार पडल्याने निवडणुकीसाठी अनेक जणांनी आपल्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातच प्रभाग क्रमांक ४ हा अनुसूचित जाती महिला,अनुसूचित जमाती महिला,नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण असे आरक्षण पडलेले आहे. तसेच या प्रभागाचा विस्तार हा मांडा परिसरातील इंदिरानगर,गणेश नगर सोसायटी,बल्याणी,उंभरणी, मोहिली,गाळेगाव,एनआरसी परिसर,मोहने कोळीवाडा,मोहने गावठाण,नॅशनल पॅरोडॉक्साईल परिसर असा आहे. या सर्व बाबींचा विचार करून जनतेला आता बदल हवाय असा निर्धार करून प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपच्या तेजश्री हेमंत गायकवाड या निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ दावेदार म्हणून उभ्या ठाकल्या आहेत. तेजश्री हेमंत गायकवाड ह्या भाजपचे ज्येष्ठ नेते कै.बबन गायकवाड व माजी नगरसेविका शारदाताई बबन गायकवाड यांच्या स्नुषा आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातूनच राजकारणाचे धडे हे पूर्वीपासून गिरवले गेलेले आहेत. तसेच तेजश्री गायकवाड यांचे पती हेमंत बबन गायकवाड हे भाजपचे बल्याणी वॉर्डाचे अध्यक्ष म्हणून पद भूषवित आहेत. त्यांनी विविध प्रकारे आपल्या आई वडिलांचे ध्येय जिवंत ठेवून समाजासाठी धावून जात आहेत. अनेक संस्था,संघटना,मंडळे यांना नेहमीच आर्थिक हातभार ते लावीत असतात. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्यांचा निपटारा ते करीत आहेत. त्यातच पॅनकार्ड शिबीर,मतदान ओळखपत्र व अन्य शासकीय कागदपत्रे त्यांनी त्यांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत काढून दिलेली आहेत. तसेच काही शैक्षणिक दृष्टया आर्थिक मागास असलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्षी ते फी भरतात. तर काही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सायकली हि मोफत देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला होता. या सर्व बाबींचा विचार करता नागरिकांचा हि सौ.तेजश्री हेमंत गायकवाड यांना भरघोष पाठिंबा मिळेल यात तिळमात्र शंका नाही. या साठीच भाजप च्या प्रभाग क्रमांक ४ मधून प्रबळ दावेदार म्हणून अनुसूचित जातीच्या तेजश्री हेमंत गायकवाड ह्या प्रबळ दावेदार म्हणून एक भक्कम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. तर पक्षाकडून शंभर टक्के माझी निवड केली जाईल असा मानस तेजश्री गायकवाड यांनी व्यक्त केला असून कोणत्याही परिस्थिती मध्ये आपण पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थकी लावू असा निर्धार हि त्यांनी व्यक्त केलेला आहे.