• Total Visitor ( 430750 )
News photo

टोकावडे ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

Raju tapal August 24, 2025 52

टोकावडे ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन



ग्रामीण रुग्णालय टोकावडे यथे हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी तयार न झाल्यामुळे उत्पन्न झालेल्या थॅलेसेमिया thalassemia ग्रस्त विद्यार्थ्यांच्यासाठी रक्तपुरवठा / प्राप्ती करीता - दि 25 ऑगस्ट 2025. वार  सोमवारी ( स.10 ते दुपारी 4 ) पर्यंत भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी रक्त दान करणाऱ्या टोकावडे परिसरातील दानशूर रक्तदात्यांनी/नागरिकांनी या रक्त दान यज्ञ - शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात सामिल व्हावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रामुख्याने या शिबिरात,

रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वय - 18 ते 65 वर्षे असावे

वजन - किमान 45 ते 50 किलो असावे

हिमोग्लोबिन पातळी - स्त्रियांसाठी किमान 12.5 आणि पुरुषांसाठी 12 असावी आरोग्य स्थिती - व्यक्ती पूर्णपणे निरोगी असावी, सध्या कोणताही संसर्गजन्य आजार नसावा  आजार - मलेरिया, एचआयव्ही, हेपाटायटीस बी/सी, टीबी, कर्करोग अशा आजारांनी ग्रस्त व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत. निरोगी शरीर आणि तंदुरुस्ती साठी – पुरुषांनी प्रत्येक 3 महिन्यांनी व स्त्रियांनी प्रत्येक 4 महिन्यांनी रक्तदान करावे.



ब्रह्माकुमारीज समाज सेवा प्रभाग (RERF) एवं 360 डिग्री मीडिया कनेक्ट यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला आहे.



राजेश भांगे/ मुरबाड

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement