• Total Visitor ( 385176 )
News photo

सिद्धार्थ बुद्ध विहारात वधू वर परिचय मेळावा संपन्न

Raju tapal January 12, 2026 137

सिद्धार्थ बुद्ध विहारात वधू वर परिचय मेळावा संपन्न



टिटवाळा नालंदा शाखेचे आयोजन



राजू टपाल. 

टिटवाळा:-  भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहरातील शाखा नालंदा या शाखेने दिनांक 11 जानेवारी, 2026 रोजी सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिम येथे वधू वर परिचय मेळावा आयोजित केला होता. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा शीलाताई तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उद्घाटन प्रसंगी बहुजन उत्थान सेवा समिती अध्यक्ष विजय भोईर,बंदेश जाधव, सनी जाधव व नालंदा शाखेचे अध्यक्ष संदीप घायवट उपस्थित होते. गेल्या चार वर्षांपासून नालंदा शाखा सदर उपक्रम राबवत आहे. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर,समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर,वर्षावास,बारा पौर्णिमा,धम्म पर्यटन व निरनिराळी शिबिरे शाखा राबवत असते. या शाखेस ज्येष्ठ बौद्धाचार्या के.एल.उघडे गुरुजी,भागीरथ शिंदे गुरुजी,यांनी कौतुकाची थाप व शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यास पन्नासहून अधिक उमेदवारांनी आपले नाव नोंदणी केली आणि आपला परिचय दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रफुल शार्दुल गुरुजी यांनी केले आणि नालंदा शाखेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement