सिद्धार्थ बुद्ध विहारात बुद्ध जयंती साजरी
भारतीय बौद्ध महासभा
टिटवाळा :- कल्याण तालुका अंतर्गत टिटवाळा शहरातील तक्षशिला शाखा,नालंदा शाखा,भीमाई शाखा,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर शाखा आणि बहुजन उत्थान सेवा समिती टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने,
विश्वकल्याणाचा संदेश देणारे,विश्वगुरू तथागत सम्यक सम्बुद्द शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची 2587 वी जयंती उत्सव सिद्धार्थ बुद्ध विहार आंबेडकर नगर मांडा टिटवाळा येथे मंगलमय आनंदमय, वातावरणात साजरा करण्यात आली.
या बुद्ध जयंती सोहळ्यास टिटवाळा शहरातील सदाचार संपन्न, शील संपन्न उपासक आणि उपासिका,आदरणीय बौद्धांचार्य,केंदीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक दलाचे पदाधिकारी,
ठाणे जिल्हा,कल्याण तालुका आणि ठाणे जिल्हा महिला शाखा भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच राजकीय,सामाजिक,धार्मिक, प्रशासकीय क्षेत्रात योगदान असलेले अनेक सन्माननिय मान्यवर उपस्थित होते.
या बुद्ध जयंती उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष बहुजन उत्थान सेवा समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टिटवाळा शहराचे पदसिद्ध अध्यक्ष नेहमी धम्मकार्यात मोलाचे योगदान असलेले आदरणीय आयु .विजयजी भोईर यांनी स्वीकारले .
कार्यक्रमाची सुरवात बुद्ध आणि भीमगीते आदरणीय जेष्ठ बौद्धांचार्य केंद्रीय शिक्षक,ठाणे जिल्ह्याचे माजी कोषाध्यक्ष आदरणीय के.एल.उघडे गुरुजी यांनी आपल्या सुंदर पहाडी आवाजात भीम गीतांची ची पेशकश केली. त्याचप्रमाणे आदरणीय मंदाताई भालेराव,गायकवाड ताई ,आणि जेष्ठ बौद्धांचार्य तक्षशिला शाखेचे संस्कार सचिव आदरणीय रवींद्र बागुल गुरुजी यांनी मधुर वाणीने वातावरण प्रसन्न केले. त्यांनंतर त्रिशरण आणि पंचशील सुत्तपठण घेऊन कार्यक्रमाची सुरवात केली
बुद्ध जयंतीस आदरणीय केंद्रीय शिक्षिका हर्षदाताई उबाळे यांनी वैशाखी पौर्णिमेचे महत्व आणि बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या .
आदरणीय केंद्रीय शिक्षिका आणि ठाणे जिल्हा महिला शाखा अध्यक्ष सन्माननिय शीलाताई तायडे यांनी वैशाखी पौर्णिमा आणि सम्यक सम्बुद्द तथागत बुद्ध यांच्या जीवनातील घडलेल्या घटना,बुद्धांचा जन्म,सिद्धार्थ गौतमास बुद्धत्व प्राप्त होणे , आणि महापरिनिर्वाण हया घटना यांचे महत्व हया विषयावर प्रबोधन केले. सर्व उपासकांना शुभेच्छा दिल्या .
हया कार्यक्रमाचे सूत्र संचालन बौद्धांचार्य आणि तक्षशिला शाखेचे सरचिटणीस आदरणीय दत्तू पालवे गुरुजी यांनी केले.
भीमाई शाखेचे जेष्ठ पदाधिकारी आदरणीय पी.एस.बल्लाळ गुरुजी ह्यांनीही शुभेच्छा दिल्या .
बुद्ध पौर्णिमा निम्मित डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर जयंती उत्सव कमिटी मांडा टिटवाळा पश्चिम यांनी खीर दान केली. तर B. A जाधव, गणेश जाधव (टिटवाळा), सुरेश जाधव (जेष्ठ नागरिक कट्टा), सुधाकर जाधव, नामदेव जाधव हे ही उपस्थित होते.
हया कार्यक्रमाचे सन्माननिय अध्यक्ष आदरणीय विजयजी भोईर यांनी अध्यक्षीय भाषणाने सर्व उपासक उपासिका यांना धम्माचे मार्गदर्शन केले आणि सर्वाना जयंतीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.