• Total Visitor ( 428050 )
News photo

मोहने येथील व्यापारी प्रवीण गडा यांच्यावर प्राणघातक हल्ला 

Raju tapal April 29, 2025 116

मोहने येथील व्यापारी प्रवीण गडा यांच्यावर प्राणघातक हल्ला 



व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या मुलासही केली मारहाण



मोहने :- मोहने परिसरातील व्यापारी प्रवीण गडा यांच्यावर जमावाने पाठीमागुन येत प्राणघातक हल्ला केला असून खाजगी प्लंबरच्या बेकायदेशीर पाईप लाईन जोडणीला विरोध केल्यामुळे गडा यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या प्रवीण गडा यांच्या मुलालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मोहने येथील जैन मंदिराजवळील रस्त्यावर घडली असून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपने एका खाजगी प्लंबरकडून मुख्य वाहिनीला दोन इंची जलवाहिनी जोडणीचे काम सुरु होते. शासकीय मालमत्तेस हानी पोहोचवून आणि नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररित्या पाणीची पाईप लाईन जोडणी घेतली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रवीण गडा यांनी याबाबत येथे काम करणाऱ्या खाजगी प्लंबरला विचारणा केली. यावेळी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या ०८ ते १० जणांच्या जमावाने गडा यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना दगडगोटे लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून छातीत आणि मेंदूला जबर मार लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या प्रवीण गडा यांचा मुलगा पार्थ गडा याला देखील जमावाकडून लक्ष्य करून मारहाण करण्यात आली. मोबाईल हिसकावून मोबाईल फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला या संपूर्ण प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खडकपाडा पोलिसांनी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी गडा कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी खडकपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement