शिवसेनेचे चार उमेदवार बिनविरोध झाल्याने डोंबिवलीत जल्लोष
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका प्रभाग क्रमांक 24 मधुन शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक तसेच माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे,वृषाली जोशी तसेच पॅनल क्रमांक 28 शिवसेना महायुतीचे हर्षल मोरे बिनविरोध झाले आहेत हे चारही उमेदवार शिवसेनेचे आहेत,डोंबिवली येथे जल्लोष साजरा करण्यात आला,ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाके अतिशबाजी करण्यात आलीपेढे वाटण्यात आले,आमदार राजेश मोरे,राजेश कदम यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते,यावेळी बिनविरोध झालेले उमेदवार रमेश म्हात्रे यांनी सांगितले की तत्कालीन मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक यांना मोठा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे,पाच वर्ष संपली होती,परंतु निधीची कमतरता कधीहि भासली नाही,कोवीड कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बेडची व्यवस्था केली होती आजहि त्याचे काम जनतेच्या मनात आहेत,तसेच आणखीहीं काही उमेदवार बिनविरोध होतील व महायुतीचा महापौर होणार असे सांगितले.