कल्याण न्यायालयात गोंधळ;सुनावणीदरम्यान आरोपीची आत्महत्येची धमकी,धनादेश भिरकावला...मेंटेनन्स देऊनही मुलाला भेटू दिले जात नसल्याचा आरोप करत न्यायालयीन कामकाजात अडथळा...आरोपी दर्शनकुमार पंडीतविरुद्ध महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कल्याण :- कल्याण येथील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सुनावणीदरम्यान एका आरोपीने गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. दर्शनकुमार मयांकभाई पंडीत (वय ४०),मूळ रहिवासी गुजरात,याला मेंटेनन्स संदर्भातील प्रकरणात न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी सुरू असताना आरोपीने न्याय मिळत नसल्याचा आरोप करत न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आणला. “मी पत्नीला नियमित मेंटेनन्स देतो,तरी मला मुलाला भेटू दिले जात नाही,” असे सांगत त्याने संताप व्यक्त केला. त्यानंतर न्यायालय अर्जदाराची बाजू घेत असल्याचा आरोप करत त्याने दंडाधिकाऱ्यांच्या डायसच्या दिशेने मेंटेनन्सचा धनादेश फेकल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेदरम्यान आरोपीने मोठ्याने आरडाओरडा करत शांततेचा भंग केला तसेच न्याय न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिल्याची नोंद आहे. या प्रकारानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याच्याविरुद्ध महात्मा फुले पोलिस ठाणे येथे संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दर्शनकुमार मयांकभाई पंडीत (वय ४०),मूळचा गुजरात येथील रहिवासी,याला मेंटेनन्स संबंधित प्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील तिसऱ्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.सुनावणी सुरू असताना दर्शनकुमार याने न्यायालयातच आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप केला. “मी पत्नीला नियमित मेंटेनन्स देतो,मात्र मला माझ्या मुलाला भेटू दिले जात नाही,” असे म्हणत त्याने संताप व्यक्त केला. न्यायालय अर्जदाराचीच बाजू घेत असल्याचा आरोप करत त्याने न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या डायसच्या दिशेने मेंटेनन्सचा धनादेश भिरकावला.यावेळी त्याने न्यायालयात आरडाओरडा करत कामकाजात अडथळा आणला व शांततेचा भंग केला. तसेच “मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करीन,” अशी धमकीही न्यायालयासमोर दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.या प्रकारानंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार आरोपीविरुद्ध महात्मा फुले पोलिस ठाण्यात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.