• Total Visitor ( 84629 )

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून

Raju Tapal September 25, 2022 30

चारित्र्याच्या संशयावरून महिलेचा खून
           
चारित्र्याच्या संशयावरून शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी गावच्या हद्दीतील म्हसेफाटा येथील टेमकरवस्तीवर नव-याने पत्नीचा खून करण्याची घटना शुक्रवारी घडली.
ललिता महादेव काळे वय -३५ असे मयत महिलेचे नाव असून चांदणी पवार यांनी या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याचे शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी सांगितले.
 ललिता महादेव काळे हीचे राहत्या घरामध्ये तिचा नवरा महादेव सुरेश काळे याने त्याची बायको ललिता महादेव काळे वय -३५ हिला तिच्या चारित्र्यावर संशय घेवून कु-हाडीने तिच्या चेह-यावर, तोंडाजवळ, डावे हाताच्या मनगटाजवळ व उजव्या हातावर वार करून तीचा खून करून मोटरसायकलवर पळून गेला आहे. आरोपी महादेव सुरेश काळे याला पकडण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनने  २ पथके तयार केली आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी सांगितले.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement