छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026
मुंबई,कोल्हापूर,लातूर उपांत्य फेरीत
बदलापूर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग २ लढती जिंकून यजमान मुंबईसह कोल्हापर व लातूर विभागाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.बदलापूर जिमखाना मैदानावर विघुत प्रकाशझोतात रंगलेल्या राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा दुसरा दिवस कोल्हापूर गाजविला.१८ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर संघाने पहिला सेट गमावून 26/28,25/21,15/12 गुणांनी मुंबईला हरवून मैदान गाजवले.या गटातील दुसऱ्या साखळी लढतीत लातूरने पुण्याची विजयी वाटचाल रोखत उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.२१ वर्षांखालील मुलीच्या गटात मुंबईने पुणे संघावर 25-19,25-19 गुणांनी मात करीत उपांत्य फेरीत मजल मारली आहे.याच गटात नागपूरने संभाजीनगरला -25-5,25-6 एकतर्फी पराभून करीत स्पर्धेत आपले आव्हान कायम राखले आहे.१८ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर विरूध्द मुंबई लढत लक्षवेधी ठरली.पहिल्या मिनिटापासून रंगलेल्या या सामन्यात पहिला सेटवर मुंबईचे वर्चस्व गाजवले.मेहूल ताजणे व यश शेट्टीने आक्रमक खेळी करीत पहिला सेट मुंबईच्या नावावर जमा केला.दुसऱ्या सेटमध्ये कोल्हापूरच्या मुलांनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन घडवित सामन्याचे पारडे फिरवले. वैभव ढगेचे जोरदार स्मॅशेस् व निखिल वाघच्या सुरेख पासवर सलग दोन सेट जिंकून कोल्हापूरने सामना जिंकत आपला उपांत्य फेरीतील प्रवेशही निश्चित केला.आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असणाऱ्या लातूर संघाने १८ वर्षांखालील मुलांच्या गटात चमकदार खेळाचे प्रदर्शन घडवले. पुणे संघाला 25- 19,25- 21 गुणांनी पराभूत करीत विजेतेपदाकडे वाटचाल कायम ठेवली आहे.लातूरकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीयश खांडेकर,सुवेज शेख,फैजान शेख यांनी तुफानी खेळ करीत उपांत्य फेरीकडे कूच केली.या पराभवामुळे पुण्याची विजयी वाटचाल थांबली आहे.उपांत्य फेरीसाठी शेवटच्या अमरावती विरूध्दचा सामना जिंकणे गरजेचे आहे.२१ वर्षांखालील मुलीच्या गटात मुंबईने सलग दुसरा विजय संपादन केला.शिवप्रिया पनीकर,दिव्या महेता व वेदिका सामगिर या खेळाडुंच्या जोरावर मुंबईने पुण्याला शेवटपर्यंत झुंज देत मैदान मारले.याच गटातील मुलांचमध्येही मुंबई संघ सरस ठरला आहे.पुणे विभागाला 17-25,25-22,15- 8गुणांनी पराभूत करीत मुंबईने पहिला सेट गमवूनही विजयश्री खेचून आणली.
लातूरच्या मुली ढसाढसा रडल्या.
गतविजेत्या लातूर संघाला १८ वर्षांखालील मुलांच्या गटात तिसऱ्या सेटमध्ये पराभवाचा धक्का बसला. सामना संपल्यानंता सारा संघ ढसाढसा रडताना दिसत होता. कोल्हापूर विरूध्द लातूरने चिवट झुंज दिली.२५-२०, २१-२५,१६-१४ गुणांनी लातूरचा पराभव झाला.आंतरराष्ट्रीय खेळाडू गायत्री नांदे,श्रृति राऊत यांचे प्रयास शेवटच्या क्षणी अपुरे ठरल्याने लातूरचा संघ भावनाविवश झाल्याचे चित्र पहाण्यास मिळाले.