श्री क्षेत्र शेंदूरजना बाजार येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी श्रीदत्त जयंती निमित्त श्री क्षेत्र शेंदुरजना बाजार येथे 2 डिसेंबर 2025 ला बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यास विद्यार्थी,शिक्षक,पालक,शाळा व्यवस्थापन समिती शेंदूरजना बाजार तसेच गावकरी व मान्यवर मंडळी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.बालआनंद मेळाव्यात तिवसा व मोझरी परिक्षेत्रातील शाळा सहभागी झाल्या. बाल आनंद मेळाव्याला अध्यक्ष म्हणून डॉ. अनिलजी सावरकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री संत सचिन देव महाराज तसेच शिक्षण विभाग पंचायत समिती येथील शिक्षण विस्तार अधिकारी सुनीलजी गवळी, चंद्रशेखरजी रामटेके, केंद्रप्रमुख रवींद्रजी तायडे,श्री.सुनीलजी कांबळे,जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री निमकर गुरुजी,बोडखे गुरुजी,प्रमोदजी निमकर जगदीशजी काळे,जिल्हा परिषद शाळा शेंदुरजना बाजार शाळेचे मुख्याध्यापक जयप्रकाशजी नेमाडे, विद्याविहार शाळेचे मुख्याध्यापक अनिलजी भारती, विषय शिक्षक राजेंद्र ठाकरे,कृष्णा चिचमलकर,तसेच डेहनी शाळेचे मुख्याध्यापक राहुलजी वानखेडे,तळेगाव कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा कावळे,निलेश कांडलकर,दिनेश भलावी,सुजाता ब्राह्मणे, वंदना माळोकार इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. सदर बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य,शेतकरी नृत्य देशभक्तीपर गीत, लावणी इत्यादी विविध कार्यक्रम सादर केले. सदर कलाकृतीचे परीक्षण श्री जयप्रकाश जी नेमाडे आणि सुनील जी गवळी यांनी केले. बाल आनंद मेळाव्यात सादर केलेल्या कृतीमध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा तळेगाव ठाकूर यांना मिळाला. तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शेंदूरजना बाजार,आणि तृतीय क्रमांक विद्या विहार विद्यालय शेंदूरजना बाजार यांना मिळाला. कार्यक्रमाचे संचालन कुमारी मैथली काळे हिने केले. बाल आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता श्री संत अच्युत महाराज संस्थान श्री क्षेत्र शेंदुरजना बाजार यांनी परिश्रम घेतले.