• Total Visitor ( 686977 )
News photo

तब्ब्ल ४६ वर्षांनी पुन्हा एकत्र आले वर्गमित्र

Raju Tapal publisher September 01, 2026 25

तब्ब्ल ४६ वर्षांनी पुन्हा एकत्र आले वर्गमित्र



विद्यामंदिर मांडा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात



राजू टपाल.



टिटवाळा:- मांडा टिटवाळा येथील विद्यामंदिर मांडा शाळेतील सन १९७९-८० या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवार,दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शाळेच्या परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तब्बल ४५-४६ वर्षांनंतर माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

या स्नेहसंमेलनास सन १९७९-८० या वर्षी अध्यापन करणारे माजी शिक्षक शशिकांत कर्डेकर सर,प्रमोद तरटे सर आणि शंकर गोडबोले सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी शिक्षकांसह माजी विद्यार्थी व त्यांच्या पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित जवळपास सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील ४५-४६ वर्षांपूर्वीच्या गोड आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांनंतर एकमेकांची भेट होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून जुन्या मैत्रीचा आनंद साजरा केला. या प्रसंगी माजी विद्यार्थिनी माधवी ढवळे यांनी आनंद व्यक्त करत उपस्थितांना मिठाईचे वाटप केले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यानंतर शशिकांत कर्डेकर सर, प्रमोद तरटे सर आणि शंकर गोडबोले सर या तिन्ही माजी शिक्षकांची मनोगते झाली. आपल्या माजी विद्यार्थ्यांना अनेक वर्षांनंतर एकत्र पाहून शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मनोगतांनी उपस्थित माजी विद्यार्थी भावूक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी विवेक पुराणिक सर यांनी केले. या स्नेहसंमेलनाची संकल्पना माजी विद्यार्थी सुनील दलाल यांची होती. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी विवेक पुराणिक,अनिल महाजन,राजेश गवाणकर,परशुराम धुमाळ व त्यांच्या पत्नी,विलास रसाळ तसेच मुन्ना (इकबाल) शेख या माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी दुपारी १.३० ते २ या वेळेत सर्व उपस्थितांनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला आणि आनंददायी आठवणींसह स्नेहसंमेलनाची सांगता करण्यात आली. तब्बल साडेचार दशकांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या या स्नेहमेळाव्यामुळे विद्यामंदिर मांडा शाळेचा परिसर जुन्या आठवणींनी आणि मैत्रीच्या भावनेने भारावून गेला होता.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement