कोंढापुरी येथील गोसावी बाबा मंदीराच्या पायथ्याची पडझड
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- गेल्या आठवडाभरापासून चालू असलेल्या पावसामुळे शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील गायकवाड वाड्यातील गोसावी बाबा मंदीराच्या पायथ्याची पडझड झाली.
कोंढापुरी येथे गेल्या आठवडाभरापासून मुसळधार,अतिमुसळधार पावसाची संततधार चालू आहे. पावसामुळे शेतक-यांची शेतातील कामे ठप्प झाली आहेत. सोमवार दि.२६ मे दुपारचे २ तास वगळता गेल्या आठवडाभरापासून कोंढापुरी येथे पावसाची संततधार चालू आहे.
या पावसामुळे कोंढापुरी येथील गायकवाड जुन्यावाड्याच्या बुरूजावर असलेल्या गोसावी बाबा मंदीराच्या बुरूजाची पडझड झाली.गायकवाड वाड्याचा बुरूज दगड मातीत बांधलेला असून शेजारील खोल्यांत रहिवासी वास्तव्य करत आहेत.
बुरूजाचे दगड माती शेजारील वाड्याच्या प्रवेश द्वारावर ढासळल्याने शेजारील वाड्यात वास्तव्य करत असलेल्या रहिवाशांचा प्रवेश तात्पुरता बंद झाला असून कोणतीही जिवितहानी झाली नाही.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे)