टिटवाळ्यात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन
राजू टपाल.
टिटवाळा:- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पॅनल क्रमांक 3 मधील उमेदवार दीपिकाताई प्रमोद भोय,ऍडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे हे तुतारी वाजवणारा माणूस तर शिलाताई रामदास नवाळे या हाताचा पंजा या निशाणी वर निवडणूक लढवत असून रविवारी स्वर्गीय आनंद दिघे मार्गावरील ओम ईशान इमारतीमध्ये निवडणूक कार्यालय थाटलेले आहे. सदर कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय प्रवक्ते महेश तपासे महिला विधानसभा अध्यक्षा तृप्तीताई गायकवाड,समाजसेवक वसंत दादा भोय यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महेश तपासे यांनी दीपिकाताई प्रमोद भोय,ऍडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे व शिलाताई रामदास नवाळे या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मांडा पूर्वेतील निमकर नाका,रिजेन्सी सर्वम चा परिसर,पटेल मार्ट,डिजी वन,हरी ओम व्हॅली इत्यादी परिसरात प्रचार रॅली काढली. सदर रॅली मध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला उपस्थित होत्या.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रमोद वसंत भोय,वॉर्ड क्रमांक 9 चे अध्यक्ष किरण पवार,उपाध्यक्ष मदन पाटील तुषार वैद्य,काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेश दीक्षित,मयूर सलपे इत्यादी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.