• Total Visitor ( 429479 )
News photo

बिबट्याच्या हल्ल्यात दुभती गाय मृत्युमुखी; शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील घटना

Raju tapal August 04, 2025 81

बिबट्याच्या हल्ल्यात दुभती गाय मृत्युमुखी; शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील घटना



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- बिबट्याच्या हल्ल्यात दुभती गाय मृत्युमुखी पडल्याची घटना शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज रविवार दि.३ आॅगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली गाय कोंढापुरी ता.शिरूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाशराव सोपानराव गायकवाड,पोलीस पाटील राजेंद्र प्रकाशराव गायकवाड, प्रगतशील शेतकरी अमोल प्रकाशराव गायकवाड यांच्या मालकीची असून त्यांच्या गाईंचा गोठा कोंढापुरी गावापासून बुरूंजवाडी गावाच्या दिशेने १ कि.मी.अंतरावर हराळी शेतीशिवारात आहे. ही घटना आज रविवारी पहाटे चार - पाच वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे प्रगतशील शेतकरी अमोल प्रकाशराव गायकवाड यांनी सांगितले.

या घटनेबाबत वनविभागाला कल्पना दिली असल्याचे सांगून हराळी शेती शिवारातील बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी प्रगतशील शेतकरी अमोल प्रकाशराव गायकवाड यांनी "टिटवाळा न्यूज" शी बोलताना केली.

              


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement