• Total Visitor ( 351284 )
News photo

शिरूर तालुक्यात ठिकठिकाणी दत्तजयंती धार्मिक वातावरणात साजरी

Raju tapal December 05, 2025 30

शिरूर तालुक्यात ठिकठिकाणी दत्तजयंती धार्मिक वातावरणात साजरी



शिरूर:-  तालुक्यात ठिकठिकाणी दत्तजयंती मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे  धार्मिक वातावरणात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराष्ट्र क्राईम‌ न्यूज चे मुख्य संपादक एकनाथराव आडसूळ यांनी त्यांच्या कोंढापुरी येथील आडसूळ वस्ती निवासस्थानाशेजारी दत्तमंदिर बांधलेले असून याठिकाणी गुरूवार दि.४ डिसेंबरला श्री.दत्तात्रेय जयंती मोठ्या उत्साहात,धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. दुपारी ३ ते ८ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कोंढापुरी येथील विविध संस्था,संघटना पदाधिका-यांसह ,ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दत्तजयंतीचे औचित्य साधून पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य,पत्रकार श्री.विजयराव ढमढेरे यांनीही आडसूळवस्ती येथील दत्तमंदीरातील दत्तात्रेय मुर्तींचे मनोभावे दर्शन घेतले.

अहिल्याबाईनगर येथेही महाराष्ट्र क्राईम न्यूज चे मुख्य संपादक एकनाथराव आडसूळ यांनी दत्तजयंतीचे औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन केले होते. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे श्री.गुरूदत्त सेवा मंडळाच्या वतीने दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.श्री.दत्त मंदीराला आकर्षक विद्युतरोषणाई तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.पहाटे ५ वाजता काकडा तसेच अभिषेक करण्यात आला. सायंकाळी आळंदी देवाची येथील ह.भ.प. प्रकाश महाराज पाटील यांचे कीर्तन पार पडले.तसेच दत्त जन्म पाळणा म्हणत दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील गुरवमळ्यातही‌ दत्तजयंती धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. दत्तजयंतीचे हे ६६ वे वर्षं होते. टाळ मृदंगाच्या गजरात पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.पाठकवाडा येथेही दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील उकिर्डेमळ्यातही दत्तजन्मोत्सव मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

मोराची चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब ऊर्फ संतोष उकिर्डे‌ यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दुपारनंतर होमहवन, भजनीं मंडळाचे भजन, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले.सायंकाळी ६ वाजल्यानंतर दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री.दत्त औदुंबर सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement