• Total Visitor ( 429247 )
News photo

कोरेगाव मूळ येथे दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन 

Raju tapal December 03, 2025 51

कोरेगाव मूळ येथे दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन 

शिरूर:-

कोरेगाव मूळ येथील आदर्श सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरूवार दि.४ डिसेंबरला दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री.दत्त मंदीर,बोधे,काकडे वस्ती कोरेगाव मूळ ता‌.हवेली याठिकाणी दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून गुरूवार दि.४ डिसेंबरला सकाळी ६ वाजता महापूजा,अभिषेक व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. दुपारी १२ ते ३ यावेळेत कोरेगाव मूळ,भवरापूर,उरूळीकांचन,तांबे वस्ती,अष्टापूर येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता ह.भ.प.प्रविणमहाराज चौधरी यांचे कीर्तन पार पडणार असून रात्री ७ ते ८ यावेळेत दत्त जन्म साजरा केल्यानंतर महाआरती चे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाने दत्तजयंती सोहळ्याचा समारोप होणार असल्याचे सचिन माऊली कड देशमुख यांनी कळविले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement