• Total Visitor ( 449661 )
News photo

मनसेच्या कल्याण पश्चिम विधानसभा उपजिल्हाध्यक्ष पदी दिनेश भोय यांची नियुक्ती

Raju tapal December 27, 2025 58

मनसेच्या कल्याण पश्चिम विधानसभा उपजिल्हाध्यक्ष पदी दिनेश भोय यांची नियुक्ती.



राजू टपाल.



टिटवाळा :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे आमदार राजू पाटील उपनेते व ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाने प्रदेश सरचिटणीस माजी आमदार व कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर व जिल्हाध्यक्ष विलास भोईर यांच्या सहकार्याने दिनेश रामचंद्र भोय यांची कल्याण पश्चिम विधानसभा उपजिल्हाध्यक्ष पदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लेखी पत्र देऊन नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येयधोरणे व कार्यक्रम आपल्या संघटनेत निष्टेने राबवावी असा आदेश देण्याबरोबरच मराठी बांधवना,भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अश्या प्रकारचे कार्य आपल्या हातून घडो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत त्यांना त्यांच्या पदाच्या कारकीर्तीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही अशा प्रकारचे आपले वर्तन असेल हीच अपेक्षा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement