• Total Visitor ( 435881 )
News photo

गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप – एक प्रेरणादायी उपक्रम 

Raju tapal June 27, 2025 185

गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप – एक प्रेरणादायी उपक्रम 



कर्मचारी संघटनेतर्फे ६० विद्यार्थ्यांना ₹५०,००० किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप



अमरावती :- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन,जिल्हा शाखा-अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने, जि.प.माध्यमिक कन्या शाळा कॅम्प,अमरावती येथे एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्षासाठी वर्ग ९ वी व १० वीतील एकूण ६० गरजू व होतकरू विद्यार्थिनींना अंदाजे ₹५०,००० किमतीचे अभ्यासक्रमानुसार आवश्यक पुस्तक संच मोफत वाटप करण्यात आले.२६जून छञपती शाहू महाराज जयंती निमित्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी भूषविले,तर शाळेचे मुख्याध्यापक धनंजय वानखडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पुस्तक वाटप शाळेतील शिक्षक,पदाधिकारी,व महिला प्रतिनिधींच्या हस्ते अत्यंत स्नेहपूर्वक पार पडले.

या वेळी उपस्थित मान्यवर मध्ये संघटनेचे सचिव संजय राठी,राज्य प्रसिद्धी प्रमुख हेमंतकुमार यावले,शिक्षक बँक संचालक विजय कोठाळे,कोषाध्यक्ष श्रीकांत मेश्राम,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय कविटकर,संघटक नितिन बद्रे,राहुल खेडकर,प्रितम चव्हाण,नंदू गुळधे,पराग सोनुले,दिनेश खंडारे,योगेश मालखेडे,आशिष निमकर,तसेच महिला पदाधिकारी अपर्णा आत्राम,गायत्री लाचुरे,मंगला सोळंके,मिनल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान संघटनेचे सदस्य आशिष निमकर यांचा वाढदिवस शाळेचे मुख्याध्यापक धनंजय वानखडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून साजरा करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात पंकज गुल्हाने यांनी, "इ. ९ वी मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या १० विद्यार्थिनींना इ. १० वी मध्ये सर्व शालेय साहित्य आणि आवश्यक सुविधा मोफत पुरविल्या जातील," असे आश्वासन दिले. तसेच दिलेल्या पाठ्यपुस्तक संचांची पुढील वर्षी नव्या विद्यार्थिनींसाठी रोटेशन प्रणालीने पुनर्वापर करण्याचा अभिनव संकल्प त्यांनी मांडला.

कार्यक्रम यशस्वीते मागील समर्पित योगदान शाळेचे पर्यवेक्षक संतोष पराळकर सर,शिक्षक सुरेंद्र मेटे,महेश राजुरकर,प्राजक्ता गावंडे, भावना वाढणकर,अतुल कडु,निलिमा राणे,विरेंद्र ब्राह्मण,नितीन लोणाग्रे,चारुशिला राऊत,एस.एल.मडावी,गजेंद्रसिंह धन्नावत,गोपाल बोकडे,कटकतलवारे, बाभुळकर,तसेच शिक्षकेतर कर्मचारी हेमलता मोहोड,जान्हवी मार्डीकर,सुदाम वानखडे,अशोक आडोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळकृष्ण आंधळे सर तर

आभार प्रदर्शन वरिष्ठ सहाय्यक पंकज मेंढे या अभिनव उपक्रमाबद्दल शिक्षण क्षेत्रात व समाजात सर्वत्र कौतुकाची लाट उसळली आहे. गरजू विद्यार्थिनींसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.या करीता विविध स्तरातील कर्मचारी यांनी आर्थिक मदत केली.

======================



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement