• Total Visitor ( 429673 )
News photo

कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने वयोवृद्धांना काठीचे वाटप       

Raju tapal July 17, 2025 76

कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने वयोवृद्धांना काठीचे वाटप        



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिक्रापूर येथील भैरवनाथ मंदिरामध्ये पार पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक मिटिंगमध्ये शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे यांच्या प्रेरणेतून कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ, वयोवृध्द नागरिकांना चालताना आधार मिळण्यासाठी ५० काठ्यांचे वाटप करण्यात आले. 

सरपंच रमेशराव गडदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे दिनकरराव कळमकर, शिवाजीराव मचे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, बाळासाहेब शेंडे. पोपटलाल भंडारी निवृत्ती जकाते. सेवानिवृत्त प्राचार्य बाबुराव साकोरे यांच्यासह जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement