• Total Visitor ( 702658 )
News photo

कोळी महासंघाच्या कल्याण विधानसभा अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर भोईर

Raju tapal November 21, 2025 116

कोळी महासंघाच्या कल्याण विधानसभा अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर भोईर

राजू टपाल. 

टिटवाळा :- कोळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत कल्याण येथे कोळी महासंघ आयोजित भव्य पदनियुक्ती सोहळा उत्साहात आणि कोळी समाजाच्या असंख्य महिला पुरुष यांच्या उपस्थिती पार पडला.सदर पदग्रहण सोहळ्यात मांडा पश्चिम येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर रमेश भोईर यांची कल्याण पूर्व कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

पद देऊन समाजाच्या आणि शहर विकासाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी कटीबद्ध राहण्यासाठी विश्वास निर्माण केला आहे. यासाठी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी समाजातील महिला,उद्योजक तरुण वर्ग तसेच कोळी समाजाच्या शैक्षणिक तसेच आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून अनेक योजना शासनाकडून प्राप्त केल्या आहेत. त्याचे मार्गदर्शन करून समाजासाठी सर्वतोपारी सहकार्य करण्याची बांधिलकी कोळी महासंघ करेल असे आश्वासन दिले. सामाजिक कार्यासाठी नेहमीच सहकार्य करून कोळी समाज नेहमीच नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठबळ देतील असे आश्वासन दिले आहे. याच प्रमाणे कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी कोळी समाजातील तसेच जनसामान्य यांच्यासाठी नेहमीच सक्षम पणे उभे राहणारे नेतृत्व ठाणे जिल्हा कल्याण तालुक्यात उभे राहील असे मनोगत व्यक्त केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026