डोंबिवली हादरलं बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना
बापानेच पोटच्या 2 लेकींवर केला अत्याचार,मानपाडा पोलिसानी नराधम बापाला ठोकल्या बेड्या
डोंबिवली :- डोंबिवली शहरात पापलिकेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आल्याने संपूर्ण शहरभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे . एका वाचनांचा बापाने आपल्या दोन पॉटच्या मुलींवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत या 45 वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्यात. दरम्यान या प्रकरणी तिच्या आईची भूमिका काय होती ? तिने विरोध केला होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा परिसरात राहणाऱ्या एका 45 वर्ष व्यक्तीला दोन मुली आहेत. तो कोणताही काम धंदा करत नाही तर त्याची पत्नी ती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. कामानिमित्त त्या व्यक्तीची पत्नी बाहेर असल्याने या संधीचा फायदा घेऊन विकृत बाप आपल्या 19 वर्षे मोठ्या मुलीवर गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता. मात्र याबाबत घाबरलेल्या मुलींनी आईला अथवा कोणालाही ही माहिती कळत नाही. त्यामुळे त्या विकृत बापाची किंमत अधिक वाढली. अत्याचाराचा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून पीडित मोठी मुलगी सहन करत होती.त्यानंतर या नराधमाची मजल आणखीन वाढली आणि त्यांनी तिची लहान दहा वर्षाची बहिण तिच्यावर देखील अत्याचार केल्याने मोठ्या बहिणीने या विरोधात आवाज उठून घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. हे ऐकून आईच्या पायाखालची वाळू सरकली तिने लागलीच मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन या विरोधात नराधम विकृत मुलींच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी घटनेचे गांभीर ओळखून आरोपी बापाला बेड्या ठोकून गजाआड केले आहे.