पर्यावरण व जलसंवर्धनासाठी डॉ. प्रशांत सिनकरांना दोन राष्ट्रीय पुरस्कार
पर्यावरण अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत सिनकर यांना पर्यावरण,जलसंवर्धन व सामाजिक विषयांवरील उल्लेखनीय कार्यासाठी दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.जयपूर येथील We Care Media Foundation तर्फे ‘नॅशनल इन्स्पिरेशन अवॉर्ड – २०२५’ तर बिहारमधील एम.एच.फाऊंडेशन तर्फे ‘राष्ट्र सेवा पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.गेल्या २६ वर्षांपासून पर्यावरण पत्रकारितेत सक्रिय असलेल्या डॉ. सिनकरांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.