• Total Visitor ( 702005 )
News photo

डॉ.रुपाली ढेकेकर भारत गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित.

Raju tapal January 07, 2026 86

डॉ.रुपाली ढेकेकर  भारत गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित.



अमरावती-भारत गौरव रत्न श्री सन्मान परीषद च्या वतीने भारत गौरव रत्न श्री सन्मान समारंभाचे आयोजन भारताची राजधानी दिल्ली  हॉटेल द अशोका,चाणक्यपुरी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सेवा,खेळ,संस्कृती आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात देशभरातून आलेल्या राजकीय,सामाजिक आणि विविध क्षेत्रातील २०० पेक्षा अधिक प्रमुख अतिथी सहभागी झाले होतेतर या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते आशिकी फेम अभिनेत्री अनु अग्रवाल. या सोहळ्यामध्ये पं. स.भातकुली शिक्षण विभाग येथे कार्यरत असलेल्या डॉ.रुपाली समीर ढेकेकर यांना शिक्षण व सांस्कृतिक विभागाकरिता भारत गौरव रत्न व डॉक्टरेट हा सन्मान देवून सन्मानित करण्यात आले. डॉ.रुपाली ढेकेकर मॅडम यांना हा सन्मान मिळणे ही आपल्या पं. स.भातकुली शिक्षक विभागाकरिता व अमरावती जिल्ह्याकरिता अभिमनाची बाब आहे.डॉ.रुपाली ढेकेकर मॅडम यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांचा अमरावती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापाञ,शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख,सतिश मुगल,भातकुली पं.स.चे गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे,शिक्षण विस्तार अधिकारी संतोष घुगे,सर्व केंद्रप्रमुख,विषय तंज्ञ,मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस शैलेन्द्र दहातोंडे,उमेश चुनकीकर,संतोष राऊत,राजेश सावरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026