• Total Visitor ( 460763 )
News photo

शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.संदीप सांगळे

Raju Tapal publisher March 31, 2026 28

शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे



शिक्रापूर:- शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केल्या जाणार्‍या राज्यस्तरीय १७ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे यांची निवड झाल्याची माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली. शब्दगंध साहित्यिक परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक अहिल्यानगर येथे नुकतीच संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये एकमताने डॉ.संदीप सांगळे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. डॉ.सांगळे हे तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयामध्ये मराठी विभागप्रमुख म्हणून गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचे आत्तापर्यंत स्वतंत्र लेखन आणि संपादन मिळवून १७ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी.चे ते मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ११ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.ही पदवी प्राप्त केली आहे. १७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. संदीप सांगळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांतभाऊ सातपुते,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,विद्या सहकारी बँक व शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे,महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.अर्जुन मुसमाडे यांनी डॉ.संदीप सांगळे यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement