• Total Visitor ( 471076 )
News photo

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा दणदणीत विजय 

Raju Tapal publisher April 07, 2026 25

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबचा दणदणीत विजय 



ठाणे :- स्पोर्टिंग क्लब्स कमिटी ठाणे आयोजित ३९ व्या डॉक्टर देशपांडे समर लीग स्पर्धेच्या पहिल्याच  सामन्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबने २० षटकात २९५ धावांचा डोंगर उभारला. साहिल गोडेने १०७ तर चिन्मय सुतारने ९१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याला उत्तर देताना न्यू यंगस्टार संघाचा डाव १३६ धावात आटोपला. संकेत यशवंतेंने ३ बळी टिपले.श्रीमती अनघा देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास जोशी,सचिव विकास रेपाळे,श्रवण तावडे,सतिश नाचणे,अतुल फणसे,प्रल्हाद नाखवा, मुकुंद सातघरे,हेमंत तावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विकास रेपाळे यांनी स्वखर्चाने दिलेल्या सुसज्ज शौचालयांचेही उद्घाटन करण्यात आले. त्याचा उपयोग सेंटर मैदान मध्ये खेळणाऱ्या शेकडो क्रिकेट खेळाडूंना होणार आहे. तसेच स्पोर्टिंग क्लबच्या मुलींच्या क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement