• Total Visitor ( 478861 )
News photo

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन 

Raju Tapal publisher April 12, 2026 23

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन 

      

शिक्रापूर :- आपल्या आवाजाने चित्रपट सृष्टीत जादू निर्माण करणा-या दिग्गज गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ११ एप्रिलला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसले यांनी १९४८ साली सावन आया या गाण्याद्वारे आपल्या कारकिर्दीस सुरूवात केली होती.आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १६ हजार गाणी गायली आहेत. त्यांनी केवळ हिंदीच नव्हे तर मराठी,बंगाली,गुजराती,पंजाबी,भोजपुरी,तमिळ,मल्याळम,इंग्रजी,रशियन अशा अनेक भाषांमध्ये त्यांच्या आवाजाची छाप पाडली आहे. आशा भोसले यांनी बाॅलिवूडमधील दिग्गज संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांच्याशी विवाह केला होता. आशा भोसले यांनी २२०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या सुरांची जादू दाखविली आहे.२००८ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement