• Total Visitor ( 639859 )
News photo

शेतकरी कार्यशाळेचे रांजणगाव गणपती येथे आयोजन 

Raju Tapal publisher July 01, 2026 43

शेतकरी कार्यशाळेचे रांजणगाव गणपती येथे आयोजन 



पुणे:- बाबुराव दौंडकर स्मारक समिती व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बुधवार दि.१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिरूर तालुक्यातील श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती येथील बाबुराव दौंडकर स्मारक समिती सभागृहात शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅड. धर्मेंद्र खांडरे यांनी ही माहिती निमंत्रण पत्रिकेद्वारे कळविली. शिरूर तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक‌ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात १०० एकर क्षेत्रावर आधारित शेती करणारे महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी राहूलजी‌ रसाळ प्रमुख वक्ते म्हणून,कृषी विस्तार विषय तज्ज्ञ डाॅ‌.राहूलजी‌ घाडगे हे "बदललेली पिक पद्धती"या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा,जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचुंदकर पाटील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिरूरचे सालकरी‌,शिरूरचे माजी आमदार स्व.बाबुराव दौंडकर यांच्या ३९ व्या स्मृतीदिनानिमित्त स्व.माजी आमदार बाबुराव दौंडकर यांना कार्यक्रमात आदरांजली अर्पण करण्यात येणार असून महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कृत्रिम बुद्धिमत्ता,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व बदललेली पिक पद्धती यावर आधारित आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कार्यशाळेत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे असे बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅड‌.धर्मेंद्र खांडरे यांनी सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement