• Total Visitor ( 471969 )

वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे गोळीबार;एक ठार,दुसरा गंभीर जखमी 

Raju Tapal publisher April 08, 2026 13

वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे गोळीबार;एक ठार,दुसरा गंभीर जखमी 



वैभववाडी :-तालुक्यातील आचिर्णे परिसरात मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या धक्कादायक घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,आचिर्णे परिसरात काही जण मध्यरात्री शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक गोळीबार झाला. या गोळीबारात आचिर्णे धानोगडवाडी येथील सागर पोटे (वय २६) युवकाचा जागीच मृत्यू झाला,तर दुसऱ्याच्या खांद्याला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement