राज्याचे माजी कृषी, वनमंत्री नानाभाऊ एंबडवार यांचे निधन
शिरूर:- राज्याचे माजी कृषिमंत्री,माजी वनमंत्री नानाभाऊ एंबडवार यांचे १३ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा येथे निधन झाले. नानाभाऊ एंबडवार यांचा जन्म राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे १९ नोव्हेंबर १९३६ रोजी झाला. शिक्षणासाठी ते यवतमाळ येथे गेल्यानंतर विदर्भवीर जांबूतराव धोटे यांच्या विचारांनी प्रेरित होवून त्यांनी फाॅरवर्ड ब्लाॅकमध्ये प्रवेश केला. १९७७ साली यवतमाळ लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसच्या विरोधात संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार नानाभाऊंचा फक्त १२ हजार मतांनी पराभव झाला होता.पुढे त्यांनी दिग्रस विधानसभा निवडणूक लढविली.ते आमदार होवून विधानसभेत पोहोचले.त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. १९७८,१९८०,१९८५ असे तीनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. रविवार दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्यावर पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त तरूण भारत नागपूर आवृत्तीत प्रसिद्ध झाले आहे.