• Total Visitor ( 397339 )
News photo

सांगवी सांडस -विठ्ठलवाडी बंधा-यावरून चारचाकी,जड वाहतुकीस मनाई

Raju tapal February 05, 2026 130

सांगवी सांडस -विठ्ठलवाडी बंधा-यावरून चारचाकी,जड वाहतुकीस मनाई

       

शिक्रापूर:- सांगवी सांडस -विठ्ठलवाडी कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यावरून सर्व प्रकारच्या चार चाकी वाहनांना ये -जा करण्यास तसेच जड वाहतुकीस सक्त मनाई करण्यात आलेली आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यावरील रस्ता कमकुवत झाल्यामुळे ही मनाई करण्यात आलेली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास होणा-या दुर्घटनेस तसेच जिवित व वित्त हानीस संबंधित वाहनचालक मालक जबाबदार राहातील . याबाबतीत जलसंपदा विभाग जबाबदार राहाणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे कार्यकारी अभियंता चासकमान पाटबंधारे विभाग पुणे -१ यांच्या आदेशान्वये नागरिकांना सुचित करण्यात आले आहे. दरम्यान सांगवी सांडस -विठ्ठलवाडी बंधा-यावरील रस्ता शिरूर,हवेली,दौंड या तीन तालुक्यांना जोडलेला आहे.जवळच पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना असल्यामुळे कारखान्याशी संबंधित कामामुळे कारखान्यांशी संबंधित नागरिकांना,शेतक-यांना या बंधा-यावरील रस्त्याचा वापर यापूर्वी करावा लागत होता. तळेगाव ढमढेरे परिसरातील ग्रामस्थ,प्रवासी दौंड तालुक्यातील राहू,पिंपळगाव,देलवडी,पारगाव या गावांकडे तसेच यवत, शिंदेवाडी,हिंगणगाव अष्टापूर,भवरापूर,उरूळी कांचन,वाडेबोल्हाई,केसनंद,वाघोली  या गावांकडे जाण्या-येण्यासाठी सांगवी सांडस -विठ्ठलवाडी बंधा-यावरील रस्त्याचा वापर करत होते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement