• Total Visitor ( 430373 )
News photo

स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत  ग्राहक सप्ताह  उत्साहात संपन्न

Raju tapal December 16, 2025 81

स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत  ग्राहक सप्ताह  उत्साहात संपन्न

        

शिरूर:- तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत सोमवार दि.१५ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय ग्राहक सप्ताह सोहळा समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के,शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, रांजणगावचे पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके,तालुका विस्तार अधिकारी आर आर राठोड,वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर निळकंठ गव्हाणे,उपअधीक्षक भूमी अभिलेख अमोल भोसले,दुय्यम निबंधक शिरूर चे सुरज बाबर,अन्न व पुरवठा अधिकारी सदाशिव व्हनमाने,महावितरणचे उप अभियंता सुमित जाधव इत्यादी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या योजना,अधिकार व माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी या कार्यक्रमाच महत्त्व व्यक्त केले. ग्राहक हक्क आणि त्यांची जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण केली व आपल्या पालकांनाही जागरूक होण्यासाठीचे प्रोत्साहन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल माहिती सांगितली व ऑनलाईन तसेच ऑफलाईन होणाऱ्या फसवणुकीबाबत माहिती विद्यार्थ्यांना सविस्तर दिली. तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनाचा उद्देश व ग्राहकांचे हक्क याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष डॉक्टर सुजित शेलार,सचिन पंडित प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी यांनी या कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेच्या वतीने ही माहिती देण्यात आली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement