• Total Visitor ( 481776 )
News photo

२ लाख २० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांकडून लंपास

Raju tapal August 06, 2025 61

२ लाख २० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांकडून लंपास; शिरसगाव काटा येथील घटना     



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- सुमारे २ लाख २० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे घडली.

बाबुराव म्हाता गोरे वय -३६ रा‌.शिरसगाव काटा ता‌.शिरूर यांनी चोरीच्या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार,दि.४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते ५ आॅगस्ट २०२५ रोजी दीड वाजण्याच्या दरम्यान बाबुराव गोरे यांच्या राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून पत्र्याच्या दोन पेट्यांमधील अंदाजे १ लाख रुपये किंमतीचे दोन तोळे पाच ग्रॅमचे डोरले, अंदाजे १ लाख २० हजार रूपये किंमतीचे तीन तोळे वजनाच्या पुतळ्या असा एकूण २ लाख २० हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबविला.

पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम चोरीच्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement