गुजर प्रशालेत छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन
शिक्रापूर :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रशालेचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश कुंभार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे उपस्थित होते.प्रशालेचे उपशिक्षक चंद्रशेखर सातपुते व प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी सदिच्छा व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.