ढमढेरे महाविद्यालयात जीएसटी सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन
सी ए प्रसाद बजाज,शंकर भागरे यांचे उपस्थित विद्यार्थ्यांना जी एस टी करप्रणाली संदर्भात मार्गदर्शन
शिक्रापूर :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जीएसटी सर्टिफिकेट कोर्स चे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी क्रमीत अभ्यासक्रमाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्य विकास वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पंधरा दिवसीय जीएसटी सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कोर्ससाठी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील ऐंशीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून कोर्सच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शक प्रमुख वक्ते म्हणून सीए प्रसाद बजाज व सीए शंकर भागरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जीएसटी करप्रणाली संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. तर सीए दिपक सोनवणे यांनी 'वाणिज्य शाखेतील करियर संधी' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक मा.महेशबापू अरविंददादा ढमढेरे,महाविद्यालयाचे व प्राचार्य अर्जुन मुसमाडे,उपप्राचार्य पराग चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य शाखेचे व जीएसटी सर्टिफिकेट कोर्सचे समन्वयक प्रा.निलेश पाचुंदकर,सुत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले.आभार प्रा.अविनाश नवले यांनी मानले कार्यक्रमात प्रा.अश्विनी पवार व प्रा.प्रीती पवार उपस्थित होत्या.