• Total Visitor ( 702859 )
News photo

ह.भ.प.विश्वास महाराज गाडगे यांचे मिडगुलवाडीत नर्मदा परिक्रमा सहस्त्रकथन

Raju tapal March 05, 2026 67

ह.भ.प.विश्वास महाराज गाडगे यांचे मिडगुलवाडीत नर्मदा परिक्रमा सहस्त्रकथन

           

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी,कान्हूरमेसाई येथील श्री‌.अमित ज्ञानेश्वर मिडगुले यांनी १२० दिवसांत नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याच्या निमित्ताने रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी ह.भ.प.विश्वास महाराज गाडगे यांचा नर्मदा परिक्रमा सहस्त्रकथन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक,जेष्ठ पत्रकार,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज मिडगुले यांनी ही माहिती निमंत्रण पत्रिकेद्वारे कळविली आहे. रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते १२ यावेळेत नर्मदा जलपुजन व कन्या पुजन,सत्यनारायण महापूजा, ह.भ.प.विश्वास महाराज गाडगे यांचे नर्मदा परिक्रमा सहस्त्रकथन, दुपारी २ ते ७ यावेळेत मिडगुलवाडी, कान्हूरमेसाई भजनी मंडळाचा सुश्राव्य भजननांदी कार्यक्रम,दुपारी २ नंतर स्नेहभोजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026