• Total Visitor ( 623342 )
News photo

प्राचार्य गौतम मगरे सेवा निवृत दिनी हृदयस्पर्शी समारंभ उत्साहात

Raju Tapal publisher July 02, 2026 23

प्राचार्य गौतम मगरे सेवा निवृत दिनी हृदयस्पर्शी समारंभ उत्साहात



फुलगाव (गौतम पाटोळे):- पुण्यातील विद्या महामंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲड.अभय आपटे यांच्या हस्ते लक्ष्मणराव आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गौतम मगरे यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन हृदयस्पर्शी वातावरणात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपाध्यक्ष अपर्णा कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ मीनाक्षी मगरे यांचा देखील सत्कार उत्साहात करण्यात आला. या सेवापूर्ती समारंभास संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल साने,कार्यवाह लीलाधर गाजरे,संचालक पवन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्या महामंडळ संस्थेचे माजी अध्यक्ष,विद्यमान कार्यकारणी सदस्य,संस्थेतील सर्व विभागाचे शिक्षक वृंद,सेवक,सेवा निवृत्त प्राचार्य गौतम मगरे सरांचे कुटुंबीय,आप्तेष्ट,मित्र परिवार,माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, राज्य व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांच्या तर्फे प्राचार्य मगरे सर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. याच समारंभात  नवनिर्वाचित प्राचार्य अजित गायकवाड यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्याचे शिक्षिका हर्षा पिसाळ यांनी सांगितले. प्राचार्य मगरे यांनी संस्थेत 1995 ते 2026 अशी सुमारे ३२ वर्षे दीर्घ काळ सेवा रुजू केली. संस्थेच्या विविध घटकांचे वतीने हृदयस्पर्शी वातावरणात सत्कार सेवापूर्ती समारंभाची सांगता झाली. प्रस्ताविक लीलाधर गाजरे यांनी केले. परिचय प्राचार्य अजित गायकवाड यांनी करून दिला. सुमेधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement