• Total Visitor ( 482004 )
News photo

'ड्रग फ्री पुणे' मोहिमे अंतर्गत तस्कर,विक्रेत्यांची माहिती संकलित

Raju tapal May 22, 2025 95

अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाई

'ड्रग फ्री पुणे' मोहिमे अंतर्गत तस्कर,विक्रेत्यांची माहिती संकलित



पुणे :- शहरात अमली पदार्थ विक्री करणारे तस्कर,पुरवठादारांविरुद्ध 'ड्रग फ्री पुणे' मोहिमेअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.



पोलीस महासंचालक कार्यालयाने अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.त्यानुसार राज्यभरातील विविध शहरात अमली पदार्थ तस्कर,पुरवठादारांविरुद्ध कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे.या पुढील काळात अमली पदार्थ विक्रेत्यांसह त्यांना अमली पदार्थ पुरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावे,असे आदेश देण्यात आले आहे.त्यानुसार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना अमली पदार्थ विक्रेते,तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेले अमली पदार्थ विक्रेते,तस्करांची माहिती संकलित करण्यात यावी,तसेच त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.



शहरात अमली पदार्थ कसे येतात.अमली पदार्थ पुरवठादार,तस्कर,किरकोळ विक्रेत्यांची माहिती संकलित करण्यात यावी,असे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.शहरातील पाच परिमंडळातील पोलीस उपायुक्तांनी पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी.शाळा,महाविद्यालये,उपाहारगृह,पबच्या परिसरात पोलिसांनी लक्ष ठेवावे,असे आदेशात म्हटले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement